सणसवाडी प्रतिनिधी : रिजवान बागवान
सणसवाडी : दिनांक 10/2/2025 रोजी गडासिंग चिमा गाईन येरवडा,पुणे येथे सदगुरु सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा चौथा-याच्या बांधकामाला विरोध करणाऱ्यांवर सक्त कार्यवाही करुन चौथार्याच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करण्यात यावी या मागणीसाठी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गोरसेना संघटना व गोर बंजारा समाजाच्या वतीने हाजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट असा जन अकोश मोर्चा काढण्यात आला.
सदगुरू सेवालाल महाराज भारत देशातील १५ कोटी गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत असुन त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांसाठी मानवता,सहीष्णुता,सर्वधर्म समभाव हा,स्त्रि-पुरुस समानता,सारखी उच्च मुल्य जोपासण्याच्या दृष्टीने अतिशय अनमोल असे कार्य केलेले आहे तसेच या महाराष्ट्राला गोर बंजारा समाजाने हरितकांतीचे प्रणेते औद्योगिक क्रांतीचे प्रणेते मा.वसंतरावजी नाईक व सुधाकररावजी नाईक यांच्यासारखे धडाडीचे दोन मुख्यमंत्री दिलेले आहे व त्यांच्या माध्यमातुन खऱ्या अर्थाने,या आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीचे काम झालेले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.
यावेळा मोर्चाच्या माध्यामातून मागण्या 1) सदगुरु सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा-चौथर्याचे बांधकाम त्वरित चालु करावे.2) या बांधकामासाठी अडथळा निर्माण करणा-यांवर गुन्हे दाखल करु सक्त कार्यवाही करावी.3) या बांधकामासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणुक करावी.4)सदगुरु सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा बसविण्याची परवानगी द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी येरवडा पांडू लमाण वस्ती येथील समाजसेवक व माजी नगरसेवक शंकरभाऊ चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी गोरसेनेचे पदाधिकारी शंकर भाऊ चव्हाण गोर सेना प्रदेश सहसचिव,विजय भाऊ पवार,गोर सेना जिल्हाध्यक्ष पुणे,अजय राठोड,विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज चव्हाण,गोर सेना शहराध्यक्ष पुणे ॲड.आकाश राठोड,रविदादा पवार गोर सेना पुणे जिल्हा सचिव,गोर सेना शिरूर तालुकाध्यक्ष अक्षय पवार,चंदन नेणावत,मल्लेश पंवार,प्रफूल राठोड,धनराज राठोड,श्रावन राठोड यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी नगरसेविका श्वेता ताई चव्हाण,अमरसिंग राठोड,शंकर चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.






No comments:
Post a Comment