जपान येथे खेळल्या जाणाऱ्या अंध मुलींच्या सायतना कफ साठी माई बाल भवन संस्थेच्या महाराष्ट्राच्या तीन मुलींची निवड - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2025

जपान येथे खेळल्या जाणाऱ्या अंध मुलींच्या सायतना कफ साठी माई बाल भवन संस्थेच्या महाराष्ट्राच्या तीन मुलींची निवड



प्रतिनिधी : रिजवान बागवान


मावळ : महिला अंध फुटबॉल संघाचे 26 ते 31 जानेवारी पर्यंत शिबिर घेण्यात आले,या शिबिरामध्ये एकूण 18 मुलींनी भाग घेतला होता,या शिबिरामध्ये पूर्ण भारतातून सहा अंध मुलींची निवड करण्यात आली त्या मध्ये महाराष्ट्राच्या माई बाल भवन संस्थेच्या 3 मुलींची निवड करण्यात आली आहे.

        

यामध्ये कोमल गायकवाड,भाग्यश्री रुग्गी व स्वाती माने या तीन मुली जपान या देशात फुटबॉल सामने खेळणार आहेत.आता पर्यन्त निवड झालेल्या मुलीमध्ये स्वाती माने हि महाराष्ट्राची चौथी अंतरराष्ट्रिय खेळणारी अंध खेळाडू ठरली आहे.निवड झालेला संघ व माई बाल भवनाच्या या अंध तीन मुली  12 तारखेला जपान या देशात रवाना होणार आहे.       

15 फेब्रुवारी 2025 रोजी खेळल्या जाणाऱ्या सायडेन केमिकल एरिना,सायतामा जपान येथे नियोजित सायतामा नॉर्मलयझेशन कप 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल या दरम्यान भारतीय अंध फुटबॉल संघ 14 आणि 16 फेब्रुवारी रोजी जपान विरुद्ध दोन मैत्रिपूर्ण सामने खेळेल.तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या क्रीडापटूंचा विकास करण्यासाठी त्यांनी केलेले समर्पण आणि कठोर परिसर यासाठी आणि येणाऱ्या भविष्यातील स्पर्धेसाठी या मुलींना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

निवड झालेल्या मुलींची यादी 1) कोमल गायकवाड महाराष्ट्र 2) भाग्यश्री रुग्गी महाराष्ट्र 3) निर्मला बेन ठाकरडा गुजरात 4) शितल कुमारी उत्तराखंड 5)सेफाली रावत उत्तराखंड 6) स्वाती माने महाराष्ट्र गोलरक्षक-1) अपर्णा ई केरळ 2)श्रध्दा यादव उत्तराखंड 

यांची म्हणून निवडण्यात आली आहे.तसेच प्रशिक्षक म्हणून सीमा मॅडम काम पाहणार आहे.











No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here