प्रतिनिधी-रिजवान बागवान
सणसवाडी - औद्योगिक नगरी असलेल्या नालंदा बुद्ध विहार सणसवाडी ता.शिरूर या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती असंख्य महिला,पुरुष व बालक यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी माता रमाई यांच्या जीवनावर अनेक मान्यवरांनी व महिलांनी आपले विचार मांडले.
यावेळी सणसवाडी गावच्या सीआरपी व भिमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा वर्षाताई मोरे तसेच जय भीम महिला बचत गटाच्या सचिव ललिता पवार,सरीताताई खिराडे,यांनी माता रमाईंच्या जीवनावर आपले विचार मांडून सखोल असे मार्गदर्शन केले.तसेच प्रतिज्ञा मोरे या बालिकेने रमाईचे सुंदर असे गीत गायले.
धम्म बांधवांमध्ये तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भीमा कोरेगाव रनस्तंभ सेवा संघ समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष तात्याराम मोरे,वंचित बहुजन आघाडी सणसवाडी शाखा अध्यक्ष तुकाराम मोरे,जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर लोखंडे,तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सल्लागार पदमाकर तरोडेकर यांनी रमाई जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले.






No comments:
Post a Comment