सणसवाडी प्रतिनिधी : रिजवान बागवान
सणसवाडी : शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या सणसवाडी परिसरातील अंबिकानगर येथे शिवजयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.
जय अंबिका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सौ सुरेखाबाई हनुमंतराव पवार,जय अंबिका शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष गोविंद माधवराव मोरे व उपाध्यक्ष साईनाथ शेषेराव जाधव तसेच शादुल उस्मान शेख,संतोष दिगंबर ताटे,अशोक सोपान कांबळे,जगदीश ठाकुर,सचिन खोडके,दीपक जाधव,तुकाराम कार्लेकर,मनोज जाधव,भगवानराव काटमोडे,ब्रह्मानंद भारती,मदनलाल मुथा शेठ,
छोटे मावळे निखिल ताटे,अनिकेत भारती,रोहित भारती,ओमकार ताटे,वैभव भालेराव तसेच सर्व शिवभक्तांनी आज शिवजयंती निमित्त खूप जोमाने काम केले आहे आणि जय अंबिका प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नदानाचा कार्यक्रम व पत्रकार बांधवांचा शिवजयंती निमित्त सत्कार व चिमुकल्यांचा भाषण आणि पोवाडे सादर करण्यात आले.
जय अंबिका प्रतिष्ठानची स्थापना 2014 करण्यात आली.तसेच दरवर्षीप्रमाणे शिवजयंती खूप थाटामाटात संपन्न करण्यात आली.आणि या कार्यक्रमाला सौ सुरेखाताई हणुमंतराव पवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
तसेच पिसाळ मंडप डेकोरेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आणि सकाळच्या सत्रामध्ये एडवोकेट योगेश वकील साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व रात्री ठीक आहे.9 वाजून 35 मिनिटांनी शिवजयंती कार्यक्रमाचे शिवजयंती शिवगर्जना करून शिवजयंतीची सांगता करण्यात आली.








No comments:
Post a Comment