दौंड प्रतिनिधी : अविनाश लोंढे
यवत : दिनांक २०. पुणे सोलापूर महामार्गाच्या यवत हद्दीतील उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये सुमारे एक किलोमीटर लांबीची एम.बी.सी.बी बसवण्याबाबत तसेच उड्डाण पुलावर कॅमेरे बसवण्याबाबत युवासेना तालुका युवा अधिकारी शुभम माळवे यांच्याकडून यवत पोलीस स्टेशन व पाटस टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
पुणे सोलापूर महामार्गाच्या यवत हद्दीतील चायनीज क्रमांक ४३ व चायनीज क्रमांक ४४ या हद्दीत तसेच उड्डाण पुलाच्या पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर यवत येथील ग्रामस्थ व प्रवासी अनधिकृतपणे महामार्ग ओलांडत असतात.
त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.सदरील अपघात रोखण्यासाठी उड्डाणपुलाच्या वरील दुभाजकावर तसेच उड्डाणपुलाच्या पुणे बाजूकडील दुभाजक एम.बी.सी.बी लावल्यास त्या ठिकाणी प्रवासी अनधिकृतपणे महामार्ग ओलांडणार नाहीत.त्यामुळे अपघाताचे प्रमाण आटोक्यात येईल.
तसेच उड्डाणपुलावर रात्रीचे चित्रीकरण ही स्पष्ट दिसेल असा कॅमेरा बसवणे ही आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी युवासेनेचे दौंड पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







No comments:
Post a Comment