देवधरी येथे गोऱ्ह्याची वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शिकार - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 25, 2025

देवधरी येथे गोऱ्ह्याची वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शिकार


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडू भारसकरे


राळेगाव : राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मंगला वाघाडे यांच्या मालकीच्या गोऱ्ह्याची अज्ञात वन्यप्राण्याकडून शिकार करण्यात आली. गोऱ्हा शेतात बांधलेला असताना त्याच्यावर हल्ला झाला.

सकाळी गावकऱ्यांना गोऱ्हा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ वनविभागाला कळवले. वनपरिक्षेत्र सहायक श्री. एम.यू. टोगे (वडकी) आणि बीट क्षेत्र अधिकारी कु. आरती बारस्कर (विहीरगाव) घटनास्थळी दाखल झाले. 

त्यांनी पाहणी केली असता गोऱ्ह्याच्या मानेवर मोठ्या जखमा आढळल्या, तसेच मागच्या बाजूस गंभीर जखमा होत्या. या जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने गोऱ्ह्याचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले.

वनविभागाने पंचनामा करून शवविच्छेदन केले. नेमका कोणत्या वन्यप्राण्याने हल्ला केला, याचा तपास वनपरिक्षेत्र सहायक श्री. टोगे व बीट क्षेत्र अधिकारी कु. बारस्कर करत आहेत.

यावेळी बंडू भारसकरे (पत्रकार), जयपाल पेदोंर, प्रमोद आंग्रे, सुभाष भारसकरे, विजय आत्राम आदी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here