त्रिवेणी संगमाचे जल मानवत वासियांना शाहीस्नानसाठी - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 25, 2025

त्रिवेणी संगमाचे जल मानवत वासियांना शाहीस्नानसाठी


मानवत प्रतिनिधी : डॉ. अंकुशराव लाड


मानवत : महाशिवरात्रीनिमित्त घराघरात येणार प्रयागराज  महाकुंभाचे  जल ; डॉ अंकुश लाड यांचा उपक्रम मानवतकरांना महाशिवरात्री चे पावन मुहूर्तावर  प्रयागराज महाकुंभ येथील शाही स्नानाचा प्रत्यक्ष योग यावा.  शहरातील प्रत्येक घरात प्रयागराज येथील गंगाजल पोहोचन्यात यावे या संकलपनेतून डॉ अंकुश लाड हे महाकुंभमेळा स्नानासाठी  प्रयागराज येथे गेले असता संपूर्ण मानवतकरांना कुंभस्नानाचा पुण्यलाभ व अनुभूती मिळावी या हेतूने संकल्प सोडला होता. तो संकल्प मानवत शहरातील पाण्याच्या स्रोत असलेल्या जलकुंभ मध्ये त्रिवेणी संगम चे जल विसर्जित करून पूर्णत्वास  नेण्यात आला . हा कार्यक्रम २४ फेब्रु रोजी सकाळी १० वाजता पार पडला. 

१४४ वर्षानंतर येणारा महाकुंभ मेळा सध्या प्रयागराज येथे सुरू आहे.  या महा कुंभमेळ्या मध्ये असलेल्या एकूण शाही स्नानास जाण्यासाठी भारतच नव्हे तर जगभरातून भाविक येत आहेत. परंतु सर्व जणांना त्या ठिकाणी जाणे शक्य नसल्याने मानवत शहराचे युवा नेते डॉ. अंकुश लाड , आमदार राजेश विटेकरां सह महाकुंभमेळा येथे  जाऊन आले. त्या ठिकाणचे त्रिवेणी संगम चे शाही स्नानाचे जल मानवत येथे  घेऊन आले . हे आणलेले जल मानवत शहराच्या   पाणीपुरवठाच्या  असलेल्या जलकुंभ  व मुख्य स्त्रोत असलेले झरी येथील तलावामध्ये हे त्रिवेणी संगमाचे जल पूजन करून त्यामध्ये प्रवाहित करण्यात  आले. याचमुळे आता मानवत  शहरातील प्रत्येक नागरिकाला येणाऱ्या तीन दिवसांमध्ये  प्रयागराज येतील कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाचे जल नळातून प्राप्त होणार आहे.   त्यातून शाहीस्नानाच्या साठी असणारे जल मिळणार आहे.  हा उपक्रम मानवत शहराचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या संकल्पनेतून पार पाडला. 

गेल्या चार दिवसांपूर्वी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भैय्या विटेकर,  मानवत शहराचे  युवा नेते डॉ. अंकुश लाड व बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर या तिघांनी प्रयागराज येथे जाऊन शाही स्नान केले. परंतु मानवत शहरातील प्रत्येक नागरिकाला हे शाहिस्नान  करता येणार नाही . त्यामुळे आपण या शाहीस्नान चे जल  मानवत येथे नेऊन त्याची विधिवत पूजन करून पाण्याच्या स्त्रोतामध्ये टाकले तर मानवत वासियांना देखील शाही स्नानाचा लाभ मिळेल.  या संकल्पनेतून डॉ. अंकुश लाड यांनी प्रयागराज येथून साधारणतः ५० लिटर जल घेऊन आले.

या जलाची विधीवत पूजा मानवत येथील जलकुंभ येथे असलेल्या महादेव मंदिरात  करण्यात आली. हे जल पूजन करून महामंडलेश्वर ह भ प मनीषानंद महाराज यांच्या हस्ते प्रवाहित करण्यात आले.  त्यानंतर काही  जल मानवत शहरास पाणीपुरवठाचे मुख्यस्त्रोत असलेले झरी येथील तलावामध्ये देखील विधिवत पूजन करून प्रवाहित करण्यात आले.  या विसर्जित केलेल्या त्रिवेणी संगम चे जल  मुळे मानवत वासियांना देखील शाही स्नानाचा अनुभव मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे . 

प्रयागराज येथील हे पवित्र गंगाजल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मानवत व झरी वॉटर सप्लाय फिल्टरमध्ये आचार्य महामंडलेश्वर १००८ गुरुवर्य स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या हस्ते विधीपूर्वक अर्पण करण्यात आले. तत्पूर्वी भगवान शिवशंकराची पूजा करून प्रार्थना केली. या कार्यक्रमास व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक बाळासाहेब मोरे , संजय लड्डा , सुरेश काबरा , दिगंम्बर बाकळे ,संजय नाईक , सोमनाथ कडतन , ऍड अनिरुद्ध पांडे , दत्त चौधरी , सचिन मगर , सुरेश कच्छवे , संदीप गवारे , परिसरातील नागरिक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here