न्हावरे : न्हावरे येथील बाजारतळामध्ये भाजी विक्री करणारे संजय बबन जाधव यांची बाजारतळात असलेल्या वाचनालया शेजारून गाडी नंबर एम एच १२ बी एन १८५६ इंजीन नंबर 02E18M25901 व चेसी नं. 02E20C24981 नंबरची १५००० रुपये किंमतीची स्प्लेंडर दुचाकी गाडी अज्ञात चोरटयाने चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संजय बबन जाधव यांनी अज्ञात चोरट्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हा प्रकार दि.१४/०२/२०२५ रोजी दुपारी २.३० वा च्या सुमारास घडल्याचे सांगितले.
भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सो. संदेश केंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार पो.हवा भोते साहेब तसेच दाखल अमलदार पो.हवा टेगले करत आहेत.









No comments:
Post a Comment