मुंबई : राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली असून, 8 मार्च 2025 रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.
राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार –83% लाभार्थी विवाहित महिला 11.8% अविवाहित महिला 4.7% विधवा महिला घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचा वाटा 1% पेक्षा कमी आहे.
30 ते 39 वयोगट – 29% महिलांना लाभ 21 ते 29 वयोगट 25.5% लाभार्थी 40 ते 49 वयोगट – 23.6% महिला 60 ते 65 वयोगट – 5% महिला
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना आर्थिक मदतीचा लाभ मिळावा म्हणून 8 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल. त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी मिळेल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर
‘माझी लाडकी बहीण’ योजनेवर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. मात्र, यावर प्रत्युत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, "महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विरोधकांना सुरुवातीपासूनच ही योजना खुपते, त्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे."राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा आधार मिळत असल्याने महिलांमध्ये या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.








No comments:
Post a Comment