
शिंदवणे (गणेश महाडिक) : अनाठायी खर्चाला फाटा देत पत्रकार भाऊसाहेब महाडिक यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. गरजू विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप आणि अनाथ मुलांना अन्नदान करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
भाऊसाहेब महाडिक हे दैनिक सामनाचे पत्रकार असून लोणी काळभोर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच हवेली तालुका माध्यमिक शिक्षण संघाचे सचिव आणि हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघाचे सचिव म्हणूनही ते जबाबदारी सांभाळतात.
हवेली तालुक्यातील शिंदवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव राजेंद्र पितळीया, शिवसेना विभाग प्रमुख कुंजीर पाटील, पत्रकार नितीन करडे, मुख्याध्यापक जनार्दन कुंजीर, डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविंद्र भोळे, तसेच अनेक शिक्षक व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील डाळिंब बंन येथील श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील अनाथ मुलांसोबत अन्नदान करून भाऊसाहेब महाडिक यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या वेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. ह. भ. प. सचिन माथेफोड, पत्रकार सुनील तुपे, श्री विठ्ठल देवस्थानचे सचिव एल. बी. कुंजीर, डाळिंब ग्रामपंचायत उपसरपंच आणि दौंड तालुका शिवसेना उपप्रमुख सर्जेराव म्हस्के, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश लेकूळे महाराज, महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ह. भ. प. काशिनाथ दिवेकर, इतिहास संशोधक खालील भाई शेख, पत्रकार सहदेव खंडाळे आणि पत्रकार अमोल भोसले उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी आणि गरजूंसाठी काहीतरी करण्याची भावना ठेवून वाढदिवस साजरा करणे ही एक प्रेरणादायी बाब आहे. भाऊसाहेब महाडिक यांच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.








No comments:
Post a Comment