भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 12, 2025

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला

पारनेर उपसा जलसिंचन योजना सर्वेस निधी उपलब्ध करुन देऊ... जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पारनेर (अरुण बेलकर) : पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे यासाठी तालुक्यातील उपसा जलसिंचन योजनांना परवानगी देऊन सर्वेस निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच पिंपळगाव खांड धरणातील पाणी जांबुत टेकडवाडी साकुर देसवडे शिंदोडी मांडवे भागातील बंधारे भरून मिळावे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे जलसंपदा मंत्री    जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात जात भेट घेतली. तालुक्यातील पिंपळगाव रोठा कान्हुर पठार जातेगाव पुणेवाडी पारनेर शहांजपूर राळेगणसिद्धी आणि शिंदेवाडी पठार भाग भाळवणी भागाला पाणी उपलब्ध करून देऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्याची आग्रही मागणी शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री विखे पाटलांकडे केली पारनेरची दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख पुसली सली जावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील उपसा जलसिंचन योजना साठी आवश्यक असणाऱ्या 
सर्व गोष्टींची पूर्तता केली जाईल. कान्हूर पठार येथे झालेल्या पाणी परिषदेमध्ये आपण पारनेरकराना दिलेला शब्द खरा करणार आहे. 40 वर्षांमध्ये तालुक्यातील जनतेचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.पाणी परिषदेमध्ये मंत्री नामदार विखे पाटील यांनी दोन महिन्यात सर्वेसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी घोषणा केली होती मात्र दोन महिन्या प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या नसल्याचे खंत भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. पिंपळगाव खांड धरणातील पाणी शिंदोडी पर्यंत मिळावे यासाठी  आमदार काशिनाथ दाते सर व आमदार अमोल खताळ साहेब सह200 शेतकर्यांनी भेट घेतली गेली मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची भावना संघटनेने व्यक्त केली.यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, मनोज तामखडे, अन्सार पटेल, बाळासाहेब वाळुंज, सुभाष डोंगरे, अनिल सोबले, शरद बालवे,वसंत साठे, बापू (गट मेजर ), शंकर पठारे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here