
यवतमाळ (बंडु भारसकरे) : शेळी ता राळेगाव जिल्हा यवतमाळ, येथे बायफ संस्था व नाबार्ड यवतमाळ यांचे संयुक्त विध्यमाने जागतिक महिला दिवस व बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून शेळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मयुरीताई वटाणे तर प्रमुख पाहुणे श्री. अतुल इंगळे (जिल्हा व्यवस्थापक,नाबार्ड यवतमाळ) श्री. पटले साहेब (भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक राळेगाव) श्री, संदीप इंदोले साहेब (एचडीएफसी बँक शाखा व्यवस्थापक राळेगाव) सौ. वैद्य ताई (विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक राळेगाव) श्री पारडे साहेब (समन्वयक,आर्थिक साक्षरता केंद्र) सौ भारतीताई कुमरे (अध्यक्ष, राणी लक्ष्मि पाणलोट समिती) यांनी उपस्थिती दर्शविली.या मेळाव्याच्या अनुसंगाने बँक अंतर्गत सुरु असलेल्या शासकीय योजना, कर्जधारक निवडीचे
निकष, कर्ज परतफेडीचे फायदे, शेतीचा विमा, वैयक्तिक विमा संरक्षणचे फायदे, व इतर आरोग्यविषयक सुविधा, जैविक शेतीच्या पद्धती यासारख्या आवश्यक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.जागतिक महिला दिनाचे औचित्य लक्षात घेऊन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक क्षेत्रात गांव पातळीवर जाणीव जागृतीचे काम करणाऱ्या शेळी व आपटी येथील दहा महिलांचा नाबार्ड व बायफ संस्था यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन सुनंदा पुडके तर गुरुदास गिरी (प्रकल्प समन्वयक बायफ संस्था) यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमच्या यशस्वितेकरिता राणी पाणलोट क्षेत्र विकास समिती शेळी-आपटी, मातोश्री ग्रामसंघ,शेळी व ओम शांती ग्रामसंघ आपटी, व समस्त गावकरी, उमेदचे समन्वयक शीतल ठाकरे व कविता धुर्वे तसेच बायफ संस्था यांनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment