
मढी : कानिफनाथ यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संजीवन समाधीला भक्तिभावाने तेल लावण्याचा पवित्र विधी पार पडला. नगारा आणि शंखध्वनीच्या गजरात महापूजा संपन्न झाली. कानिफनाथांच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
यात्रोत्सवाची सुरुवात होळीपासून (दि. 13) होत असून, त्याआधी परंपरेनुसार मंगळवारी सायंकाळी 4 वाजता देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी चांदीच्या पादुकांची पूजा करून तेल लावण्याचा विधी पार पाडला.या सोहळ्याला देवस्थान समितीचे कोषाध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, विश्वस्त शिवजित डोके, भाऊसाहेब मरकड, श्यामराव मरकड, डॉ. विलास मढीकर, अशोक महाराज मरकड, लक्ष्मण महाराज मरकड, भाग्येश मरकड, रमाकांत मरकड, बाला मरकड, कालिदास घोडके, नवनाथ मरकड, सुरेश मरकड, माऊली मरकड, दिनेश जोशी, बाबासाहेब मरकड, अकुंश मरकड, दत्तात्रेय मरकड, भाऊसाहेब पाखरे, बाळासाहेब चितळे आदी मान्यवर आणि नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे, कानिफनाथांच्या समाधीला तेल लावल्यानंतर मढीतील सर्व जाती-धर्मांतील ग्रामस्थ गुढीपाडव्यापर्यंत व्रत पाळतात. महाराष्ट्रभर कानिफनाथांचे जेथे जेथे मंदिर आहे, त्या गावांमध्येही हे व्रत पाळण्याची परंपरा आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भक्तगण मढी येथे दाखल होत आहेत.






No comments:
Post a Comment