शिरूर तालुक्यातील विद्यार्थीनचा स्वसंरक्षण प्रशिक्षणास उत्सपूर्त प्रतिसाद : सौ.गारगी दिदी काळे - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 5, 2025

शिरूर तालुक्यातील विद्यार्थीनचा स्वसंरक्षण प्रशिक्षणास उत्सपूर्त प्रतिसाद : सौ.गारगी दिदी काळे

टाकळी हाजी (शौकत मुजावर) : समाजात महिला मुलींनवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असुन विविध उपाययोजना करत आहे.त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पुणे महिला व बालकल्याण विभाग आणि ज्ञानप्रबोधनी विकास वाहिनी संस्था मंचर यांच्या सयुक्त विद्यमाने 
शिरूर तालुक्यातील वडनेर,टाकळी हाजी, शिरूर, कारेगाव,ढोकसांगवी येथील विद्यालयीन मुलींन साठी स्वसंरक्षणासाठी व शरीरीक विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेत असुन या प्रशिक्षणास उत्सफुर्त प्रतिसाद विद्यालयातून मिळत आहे.  शिरूर तालुक्यातील विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आसल्याचे संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.गारगी दिदी काळे यांनी सांगितले .
या कामात पोलीस प्रशासन, निर्भया पथक नेहमीच सहकार्य करत असुन प्रशासन या स्तुत्य उपक्रमास प्राधान्य देत आहे. संस्थेचे कराटे प्रशिक्षक शौकत मुजावर यांच्या मार्फत वडनेर,टाकळी हाजी, ढोकसांगवी,कारेगाव तसेच शिरूर शहरात कराटे प्रशिक्षक 
एस.पवार हे प्रशिक्षण देत आहेत. विद्यार्थीनीनच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम राबाविले जात आहेत.विद्यालयांचे मुख्यध्यापक आर.बी.गावडे, बी.सोनवणे,मांजरे सर,श्रीमती व्ही. झावरे,प्रा.सुनदा लंघे सह सर्व शिक्षक यांचे प्रशिक्षणास नेहमीच मार्गदर्शन लाभत असुन या भागातील  ग्रामस्थ,पालक यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here