ऊरूळी कांचन ( गणेश महाडीक) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश परिक्षेत कु स्नेहा गोरख थोरात हिने दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग श्रेणी पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याचे अध्यक्ष दौड तालुक्यातील कासुडीऀ येथील जयहिंद हायस्कूल चे प्राचार्य जी. के. थोरात सौ. संगीता थोरात यांची कु. स्नेहा हि कन्या आहे . दौंड तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी असलेले प्राचार्य जी.के . थोरात हे मुलांच्या शिक्षणासाठी यवत, नंतर उरुळी कांचन नंतर हडपसर ठिकाणी राहण्यास गेले आहे . कु. स्नेहा हिला लहानपणापासूनच कायद्याच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा होती. वडिल जी .के थोरात व आई सौ संगिता थोरात यांची ती कन्या आहे. आई वडिल यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले कु स्नेहा गोरख थोरात हिचे प्राथमिक शिक्षण एंजल हायस्कूल ऊरूळी कांचन व माध्यमिक शिक्षण एंजल हायस्कूल लोणी काळभोर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी पुण्यातील जेधे महाविद्यालयात एल एल बी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. परिश्रम चिकाटी व जिद्द या जोरावर तिने हे यश संपादन केले.अभ्यासाबरोबरच नृत्याची विशेष आवड स्नेहाने जोपासलेली आहे अशा गुणी, हुशार, अष्टपैलू असलेल्या स्नेहा ने दिवाणी न्यायाधीश परिक्षेत यश मिळविल्याने परिसरातून कौतुक केले जात आहे . प्राचार्य जी.के. थोरात यांचा मोठा मुलगा . व स्नेहाचा मोठा भाऊ अनिकेत थोरात यांची नांदेड जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त पदा वर नियुक्ती झाली आहे. ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री सोसायटीचे संचालक अविनाश शेलुकर संस्थेच्या संचालिका परवीन इराणी मॅडम लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल च्या प्राचार्या शमशाद कोतवाल. एंजल इंग्लिश मिडियम हायस्कूलच्या प्राचार्या खुशबू सिंग, एंजल हायस्कूल ऊरूळी कांचन चे प्राचार्य चेतन सोनवणे ,एंजल हायस्कूल च्या उपप्राचार्या झिमली लोध, हायस्कूल चे व्यवस्थापक निलेश अडसूळ एंजल हायस्कूल क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांनी अभिनंदन केले आहे.
Post Top Ad
Sunday, March 30, 2025
एंजल हायस्कूल ची माजी विद्यार्थिनी कुमारी स्नेहल गोरख थोरात यांची दिवानी न्यायाधीश पदी निवड
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Top Ad
Responsive Ads Here
Author Details
Maharashtra's leading news website in Marathi.
Readers in the political, social, crime, sports fields of the country
The main objective of fresh news Maharashtra is to provide breaking news
is
We hope you will like and share




No comments:
Post a Comment