बारामती : जेजुरी-बारामती रोडवरील नाझरे फाटा येथे अपघातानंतर दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी वसंत लक्ष्मण कुलथे (वय ५२, व्यवसाय – प्लंबिंग, रा. दादा पाटीलनगर, तादूळवाडी, ता. बारामती) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
२१ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता फिर्यादींचा मुलगा तुषार कुलथे हा यमाहा एफ झेड एस 04 (क्रमांक MH42BQ5659) या दुचाकीवरून जेजुरीहून बारामतीकडे येत होता. नाझरे फाटा येथे एका दुचाकीस्वारासोबत अपघात होऊन तुषार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नागरिकांनी त्याला तातडीने जेजुरी येथील आयसीयू हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्याला बारामती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
दरम्यान, अपघातस्थळी पोलीस दाखल झाले होते आणि एका मोटारसायकलला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. मात्र, तुषार कुलथे यांच्या नावावर असलेली यमाहा एफ झेड एस 04 मोटारसायकल घटनास्थळी आढळली नाही. दुसऱ्या दिवशी कुलथे कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला, मात्र दुचाकीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
दुचाकीची माहिती:
ब्रँड व मॉडेल: यमाहा एफ झेड एस 04
गाडी क्रमांक: MH42BQ5659
रंग: मोरपंखी स्पोर्ट लुक
चॅसिस क्रमांक: ME1RG9154R0034649
इंजिन क्रमांक: G3L5E0425619
अंदाजे किंमत: ₹1,00,000/-
परिसरात शोध घेतला असता दुचाकीचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपघाताचा गैरफायदा घेत दुचाकी चोरून नेल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







No comments:
Post a Comment