स्वसंरक्षण प्रशिक्षणातून उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचा निर्धार – मुख्याध्यापक राजाराम ढवळे - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, March 6, 2025

स्वसंरक्षण प्रशिक्षणातून उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचा निर्धार – मुख्याध्यापक राजाराम ढवळे


निमोणे : शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक निमोणे गावातील नेहरू शिक्षण संस्थेचे श्री. नागेश्वर विद्यालय येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे मिळत असून, त्यास त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमास संस्थेनेही प्रोत्साहन दिले आहे.

गावात "सामाजिक दृष्टिकोनातून सुरक्षित गाव" ही संकल्पना राबवली जात आहे. ग्रामपंचायत सरपंच सौ. सुषमा काळे, उपसरपंच परशुराम अनुसे, तसेच ग्रामपंचायत सदस्य शामकांत काळे, राजश्री गव्हाणे, संजय काळे, अतुल दुर्गे, लिला काळे, शामकांत ढोरजकर, लता ताठे, संजय माळी, पार्वती सुर्यवंशी, स्वाती गायकवाड, सारिका जाधव आणि ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब शेळके यांच्या सहकार्याने हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम ढवळे यांनी सांगितले की, राज्यशासनाच्या क्रिडा विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, तसेच त्यांना ग्रेस गुण मिळतात. भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा अधिकाधिक लाभ मिळावा, 
यासाठी कराटे, तायक्वांदो, किकबॉक्सिंग, ज्युदो, जीत कुने दो, बॉक्सिंग अशा स्वसंरक्षण क्रीडा प्रकारांचा समावेश केला जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी नॅशनल पंच मुजावर एस. वाय. यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने राबविल्या जात असलेल्या या प्रशिक्षणामुळे निमोणे गाव स्वसंरक्षण आणि क्रीडा क्षेत्रात नवसंजीवनी मिळवणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकवण्याचा निर्धार विद्यालय प्रशासनाने केला आहे. यासोबतच शिरूर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाचेही वेळोवेळी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.






No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here