महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 च्या वर्धापन दिन व महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याबद्दल गौरव
पुणे : समाजसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 तर्फे दरवर्षी समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा हा प्रतिष्ठित समाजभूषण गौरव पुरस्कार 2025 सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री गणेश महाडिक यांना प्रदान करण्यात आला.
श्री गणेश महाडिक यांनी राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघामार्फत समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत, गोरगरिबांसाठी अन्न, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे सामाजिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 च्या वतीने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभ मेमाने फार्म ऍग्रो टुरिझम उरुळी कांचन तालुका हवेली येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर डॉ.. स्वामी शिव लक्ष्मी नंदगिरी आईसाहेब. व ऍड. धनराज वंजारी ज्येष्ठ व्याख्याते व साहित्यिक मा. सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई महाराष्ट्र .
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.एन .एस. रंधवा कॅप्टन यांच्या हस्ते झाले. पै. अतुल भैया कुंजीर मा.रविभाऊ बोरुडे मा.संतोष कांबळे मा.विपुल भाऊ ठक्कर मा. भगवान शिंदे व अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे संपादक माननीय श्री रमेश मामा गणगे व मुख्य संपादक स्मिताताई बाबरे यांच्या हस्ते श्री गणेश महाडिक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, समाजासाठी त्यांनी उभारलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.
समाजातील परिवर्तनासाठी राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आपले योगदान सुरूच ठेवणार असल्याचे श्री गणेश महाडिक यांनी यावेळी सांगितले.









No comments:
Post a Comment