भाकप यवतमाळ तालुका अधिवेशन उत्साहात पार – संघटन विस्ताराला गती, कॉ. ईश्वर दरवरे यांची फेरनिवड - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, March 6, 2025

भाकप यवतमाळ तालुका अधिवेशन उत्साहात पार – संघटन विस्ताराला गती, कॉ. ईश्वर दरवरे यांची फेरनिवड


यवतमाळ (बंडु भारसकरे) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) त्रैवार्षिक तालुका अधिवेशनाचा उत्साहात समारोप झाला. स्थानिक श्रमशक्ती भवन येथे झालेल्या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉ. गुलाबराव उमरतकर (राज्य कौंसिलर, किसान सभा) होते. उद्घाटन कॉ. विजय ठाकरे (जिल्हाध्यक्ष, आयटक) यांनी केले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. सुनिल गेडाम (राज्य कौन्सिलर, भाकप), कॉ. हिम्मतराव पाटमासे (सचिव मंडळ सदस्य) आणि कॉ. दिलीप महाजन (तालुका सचिव, भाकप - नेर) उपस्थित होते.

अधिवेशनात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. सदस्य संख्या वाढवणे, शाखा विस्तार करणे आणि तालुका स्तरावरील जनआघाड्या प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे ठरले. पुढील तीन वर्षांसाठी कृती कार्यक्रम ठरवण्यात आला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.

अधिवेशनाच्या शेवटी तालुका कौंसिलची निवड करण्यात आली. यात कॉ. ईश्वर दरवरे यांची पुन्हा तालुका सचिवपदी निवड झाली. सहसचिव म्हणून १) कॉ. ॲड. अरुण जवके आणि २) कॉ. ज्योती रत्नपारखी यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी कॉ. विजया वडतकर 

यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून कॉ. हिम्मतराव पाटमासे, कॉ. संजय भालेराव, कॉ. दिवाकर नागपुरे, कॉ. गया सावळकर, कॉ. विजय ठाकरे, कॉ. ममता पाटील आणि कॉ. किशोर सालपे यांची निवड करण्यात आली.या वेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here