पोखरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदीआमदार काशिनाथ दाते सरांचे निष्ठावंत सहकारी बाळासाहेब कोकाटे व्हा. चेअरमनपदी भाऊसाहेब दरेकर यांची बिनविरोध निवड - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, April 3, 2025

पोखरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदीआमदार काशिनाथ दाते सरांचे निष्ठावंत सहकारी बाळासाहेब कोकाटे व्हा. चेअरमनपदी भाऊसाहेब दरेकर यांची बिनविरोध निवड



पारनेर (अरुण बेलकर) : पारनेर तालुक्यातील पोखरी वारणवाडी म्हसोबाझाप यांच्या संयुक्त पोखरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर  आमदार काशिनाथ दाते सर यांचे निष्ठावान सहकारी  बाळासाहेब रंगनाथ कोकाटे यांची चेअरमन पदी तर व्हा.चेअरमन पदी भाऊसाहेब नकाजी दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .   बाळासाहेब कोकाटे  यांची चेअरमन निवडीची सूचना माजी चेअरमन महादू शंकर पवार यांनी मांडली तर माजी चेअरमन साहेबराव रोकडे यांनी त्यांच्या निवडीस अनुमोदन दिले.व.व्हा. चेअरमन पदासाठी भाऊसाहेब नकाजी दरेकर यांच्या निवडीची सूचना बाबाजी खैरे यांनी मांडले तर मा.चेअरमन लक्ष्मण आहेर यांनी त्यांच्या निवडीस अनुमोदन दिले. चेअरमन व्हा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक कार्यक्रम अधिकारी सहाय्यक निबंधक विकास जाधव साहेब यांनी निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले चेअरमन व्हा चेअरमन पदावर ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात आले. आमदार काशिनाथ महादू दाते सर यांनी नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब रंगनाथ कोकाटे व्हा चेअरमन भाऊसाहेब नकाजी दरेकर यांचा सत्कार केला. आमदार दाते यांनी मा चेअरमन .मा‌.व्हा चेअरमन संचालक  यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वीय सहाय्यक अशोकराव आहेर संचालक. रमेश कारंडे ज्ञानदेव पवार,सावकार गुंजाळ,पिराजी  कारंडे,. दत्ता आहेर,जयश्री शिंदे श्रीमती भिमबाई पवार.अण्णासाहेब पवार माजी सरपंच अंकुश काशीद,ग्रामपंचायत सदस्य संजय थोरात, प्रगतिशील शेतकरी बन्शी भाऊ काशीद. श्रीउत्तम कोकाटे सर सचिव राहुल सुडके साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.







No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here