
शिरूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक ,कला, सहकार आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवारांना दरवर्षी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नारी शक्ती सन्मान हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावेळी शुभांगी मैड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यांचे सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम आहे कैलास सत्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब, शोषित, वंचित, पीडितांना मदत केली तसेच शाळांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला महिलांचे समस्या समजून घेण्यासाठी अनेक मेळावे घेतले आहे महिलांना आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी त्यांनी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला त्यांच्या कार्याची द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांनी दखल घेऊन त्यांना नारीशक्ती सन्मान शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे शिरूर बार वकील संघटना अध्यक्षा ॲड. वर्षा सोनकांबळे, द युवा ग्रामीण पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, शकुंतला दीदी,द युवा ग्रामीण पत्रकार संघटना राज्य सचिव बाळासाहेब कौटुळे,द युवा ग्रामीण पत्रकार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मनियार, या मान्यवरांच्या शुभहस्ते नारीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शिरूर येथे दिनांक 27 रोजी आयोजित करण्यात आला यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अध्यक्षा निर्मला संकपाळ प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय अर्चना दीदी सावित्रीबाई महिला प्रतिष्ठान संस्थापिका कांताबाई पांढरे द युवा ग्रामीण पत्रकार संघटना शिरूर तालुका अध्यक्ष विजय कांबळे, द युवा ग्रामीण पत्रकार संघटना जुन्नर तालुका उपाध्यक्ष जयेश खांडगे, द युवा ग्रामीण पत्रकार संघटना पुणे जिल्हा पदाधिकारी व शिरूर तालुका पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment