
पुणे : बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व यांचा बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे ५७ वर्धापन दिनांक २४,२५ ,२६ जून रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात
विविध सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांना त्यांच्या कलेचे योगदान लोककलेच्या लोककलेचा गौरव म्हणून लोककला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा २०२५ चा लोककला गौरव पुरस्कार संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे चिरंजीव संजय महाडिक यांना हा पुरस्कार बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज भोसले, सचिव अनिल गुंजाळ, भू माता संघटनेच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला . संजय महाडिक हे संगीतरत्न दत्ता महाडिक यांचे चिरंजीव आहेत. ज्यांनी तमाशा कला सातासमुद्र पार केली. असे तमाशा संगीताचे शिरोमणी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन झाल्यानंतर आज पर्यत संजय महाडिक यांनी
संगीतरत्न दत्ता महाडिक लोकनाट्य तमाशा मंडळाचा फड अतिशय कष्टाने सुरू ठेवला आहे.अगदी जबाबदारी चालवून लोककला जतन ठेवण्याचे काम केले आहे. वडील कै. संगीतरत्न दत्ता महाडिक यांची गाणी आणि त्यांच्या गाण्याची लकब आजही संजय महाडिक हे हुबेहुब गाणी सादर करून रसिकांची मने खेचतात. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन बालगंधर्व परिवार ट्रस्टने त्यांना सन २०२४,२०२५ च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या कामी संजय महाडिक यांचे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सचिव अनिल गुंजाळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शासन समाजभूषण पुरस्कार्थी काशिनाथ आल्हाट ,मिटू पवार, मीरा पुणेकर, मंगरूळ गावचे माजी सरपंच दत्ता लामखडे, बांबोर्डी गावचे सरपंच सुभाष दिवटे पाटील अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय महाडिक यांचे जावई किरण रावडे पाटील, मुलगी, भाची आशा चव्हाण, थोरले बंधू सुहास महाडिक, मुलगा आकाश महाडिक, पत्नी आशा महाडिक, व नातू सर्व कुटुंबीय या आनंदी सोहळ्यास उपस्थित होते.





No comments:
Post a Comment