वाढोणा बाजार प्रा.आ. केंद्रात औषध वाटप विभागाला आग: महत्त्वाचे रेकार्ड जळून खाक - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, June 26, 2025

वाढोणा बाजार प्रा.आ. केंद्रात औषध वाटप विभागाला आग: महत्त्वाचे रेकार्ड जळून खाक


राळेगाव / यवतमाळ ( बंडु भारसकरे) :  प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथील औषध वाटप विभागात दिनांक २३ जून रोजी रात्री सुमारे साडे नऊच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत विभागातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे व रेकार्ड जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
ही माहिती रात्रपाळीतील सेवा बजावणाऱ्या ए.एन.एम. श्रीमती यशोदा आडे यांनी तातडीने फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर आलेल्या कर्मचाऱ्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहून ती नोंदवली. यावेळी औषध वाटपाशी संबंधित सर्व रेकार्ड पूर्णतः जळून गेले होते, ज्यामुळे प्रशासनिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला बरबटकर या कार्यालयात उपस्थित असूनही त्यांनी कोणतीही तातडीची कारवाई न करता थेट यवतमाळकडे प्रयाण केल्याचा आरोप कर्मचारी वर्गाने केला आहे. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या वेळी मेश्राम (परिचर) हे रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते अनेक वेळा ड्युटीवर नसतात त्यामुळे या प्रकरणास जबाबदार कोण –  मेश्राम की प्रभारी वैद्यकीय अधिकारी? – असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ही घटना सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून कार्यालयीन कामकाज व सेवा वितरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन सुरक्षेकरिता व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here