खेळाडूंना सदैव मार्गदर्शन सहकार्य करणारा अवलिया : पै. तुकाराम उचाळे - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 2, 2025

खेळाडूंना सदैव मार्गदर्शन सहकार्य करणारा अवलिया : पै. तुकाराम उचाळे


टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : विविध खेळातील खेळाडू सदैव देशाचे नाव उचवण्यासाठी प्रयत्न करत आसतात. गरीब परिस्थितीमुळे ग्रामीण खेळाडू पुढे जात नाही. अनेक संधीपासून वंचित राहतो. टाकळी हाजी बेट भागातील डोंगरगण गावचे सुपुत्र पैलवान तुकाराम उचाळे हे स्वतः कुस्ती सह बॉक्सिंग, कराटे खेळाचे खेळाडू एक नावाजलेले प्रशिक्षक मार्गदर्शक त्यांनी अनेक स्पर्धानमध्ये आपले कौशल्य सादर करत राष्ट्रीय खेळापर्यंत मजल मारत गावचे नाव उंचावले गरिब कुंटुंबातील हा खेळाडू पुढे जाण्यास धडपडत असे परंतु खेळाचे साहित्य प्रवास खर्च ,आहार, राहणे या बाबींना सदैव झगडत असे प्रवासादरम्यान दिलदार मित्रांची साथ घेत अनेक स्पर्धामध्ये विजयाचा मानकरी ठरला.
त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मी ध्येयाने पछाडलेलो होतो अनेक स्पर्धात विजयश्री खेचून आणत परंतु प्रत्येक वेळेस आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागे. वेळेप्रसंगी शेतात मोलमजुरी केली धाडस केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही .आज एक यशस्वी उद्योजक आसलो तरी ग्रामीण भागातील खेळाडूंना सदैव मदतीचा हात देत असून आपली कला जिंवत ठेवण्यासाठी त्यांनी मृत्युंजय फाईट क्लब इंडिया या स्वसंरक्षण खेळ शिकवणाऱ्या क्लब च्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू कराटे,कुस्ती, ज्युदो, बॉक्सिंग,किकबॉक्सिंग,जित कुने दो खेळास मार्गदर्शन करत खेळाडू घडवत आहे. त्यांचे अनेक गरिब कुंटूबातील खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर मजल मारत असुन लागणार खर्च हा त्याचे मित्रांन सह स्वतः करून आपले स्वप्न पुर्ण करत आहे.
हॉटेल विश्व पॅलेस उदयोग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान तुकाराम उचाळे हे भाऊ या नावाने प्रसिद्ध आसले तरी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अशी ख्याती आसणाऱ्या भाऊंच्या पाठिशी असंख्य तरुण खेळाडू वर्ग नेहमीच पाठीशी आसल्याचे दिसून येते. खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभा राहून मार्गदर्शन, सहकार्य करणाऱ्या या अवलियाची चर्चा बेट भागात सदैव होत आसते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here