
राळेगाव (बंडु भारसकरे) : दरवर्षीप्रमाणे यंदाही राळेगाव बस आगारातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी तालुक्यातील राळेगाव आगारातून दि.१ जुलै रोजी दुपारी १ वाजता वनोजा येथून ४५ विठ्ठलभक्त घेत पंढरपूर करिता राळेगाव आगाराची लालपरी रवाना झाली वनोजा ते पंढरपूर पूर्ण तिकीट ११५७ रू.असून महीलासाठी ५७९ रु.अर्ध तिकीट ठेवण्यात आले आहे,वनोजा येथून पंढरपुर ५७० किलोमीटर अंतरावर आहे. वास्तविक
पाहता खरिपाची पेरणी आटोपल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात.पेरणी करून पावसाची तमा न बाळगता ग्रामीण भागातील नागरिकांनी विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीला जाण्याची तयार केली आहे.राळेगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी देखील भरभरुन
प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.यावेळी वनोजा गावातील विठ्ठलभक्त भास्कर काचोळे,देवराव गुडधे,शालिक दांडेकर,दादाजी काटेकर,रमेश चिंचोणे यांच्यासह अनेक भाविक भक्तांसह उत्साहाच्या वातावरणात लालपरी बस पंढरपूरसाठी रवाना झाली.





No comments:
Post a Comment