वरवंड ग्राम शिक्षण संस्थेच्या एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय यांच्या स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विविध पदांवरती नियुक्त झालेले, संस्थेचे विद्यार्थी सामान्य कुटुंबातील स्वप्निल संगीता प्रकाश कुतवळ यांची महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्य निर्धारण विभागात रचना सहाय्यक पदी नेमणूक झाल्याबद्दल महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकार प्रशिक्षक व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट, संस्थेचे अध्यक्ष संजय आण्णा दिवेकर, सत्कारमूर्ती स्वप्निल कुतवळ, वडील प्रकाश कुतवळ, मातोश्री संगीता कुतवळ, महाराष्ट्राची भूमीचे संपादक आदित्य बारवकर, माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार भागवत, संदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल शितोळे, उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर, स्पर्धा समिती विभागाचे डॉ. नानासाहेब गोफणे, प्रा. संगेश यादव, कार्यालयीन अधीक्षक ॲड .संतोष रणधीर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रेय दुर्गाडे, डॉ. ज्योती माने, डॉ. नामदेव बनसोडे, डॉ. मारुती वाघमारे, प्रा. प्रकाश मचाले, प्रा. कुणाल दोशी, प्रा. भारत उगाडे, प्रा. साळुंखे, संस्थेच्या प्राध्यापिका लोंढे, प्रा. देशमुख , प्रा. संगीता साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती स्वप्नील कुतवळ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध शासकीय पदांवर झालेल्या निवडीबद्दल आपली भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व सातत्य ठेवले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकतात ही भावना व्यक्त केली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एकाच दिवशी बारा तास अभ्यास न करता तीन दिवस चार चार तास अभ्यास केला तरी देखील यश प्राप्त होऊ शकते असे सांगत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहण्याचे देखील विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या संस्थेचे अध्यक्ष संजय आण्णा दिवेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनामधील न्यूनगंड बाजूला ठेवून जर आत्मविश्वासपूर्वक आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला तर निश्चितपणे आपण आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करू शकतो व निश्चितपणे चांगले यश संपादन करू शकतो अशा प्रकारची भावना व्यक्त करून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी निश्चितपणे दूर केल्या जातील अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे असलेले माहिती अधिकार प्रशिक्षक व
पत्रकार राहुलकुमार अवचट यांनी स्पर्धा परीक्षेत अभ्यास करण्यासाठी वरवंड ग्रामसेवक संस्थेच्या वतीने सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण केले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग होऊन आपल्या आई-वडिलांचे व संस्थेचे नाव मोठे करावे असे आवाहन केले, स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून एकाच ठिकाणी न थांबता स्वप्निल कुतवळ यांनी आठ विविध परीक्षा उत्तीर्ण होत आपल्यासमोर एक मोठे उदाहरण दिले असून शेतकरी कुटुंबातील स्वप्निल संगीता प्रकाश कुतवळ यांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडो अशी इच्छा व्यक्त करत स्वप्निल कुतवळ यांची नगर रचना व मूल्य निर्धारण विभागात रचना सहाय्यक पदी नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे व उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजन स्पर्धा परीक्षा समितीचे प्राध्यापक डॉ. नानासाहेब गोफणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे व सर्व उपस्थितांचे प्रा. संगेश यादव यांनी आभार व्यक्त केले. डॉ. ज्योती माने यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







No comments:
Post a Comment