आपटी ते शेळी(महाड) रस्त्याचा मुहूर्त कधी निघणार - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, July 17, 2025

आपटी ते शेळी(महाड) रस्त्याचा मुहूर्त कधी निघणार

राळेगाव (नरेश राऊत) : तालुक्यातील आपटी (रामपूर ) ते शेळी महाड जोडणारा रस्त्याचा कधी मुहूर्त निघणार असा प्रश्न आपटी आणि शेळी महाड या गावकऱ्यांमध्ये पडला आहे,जेव्हा पासून रस्ता झाला पण अनेक 

वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही रस्त्याला कमीत कमी २० ते २५ वर्ष झाले असून प्रशासन या बाबींकडे काना डोळा करत आहे आपटी व शेळी महाड जोडनारा रस्त्याला खड्ड्याचे साम्राज्य आहे पाय कुठे टाकायचा समजेना अशी अवस्था रस्त्याची झाली आहे यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांना बैल बंडी कशी न्यायची असा प्रश्न पडतो. शेतकऱ्यांसाठी मुख्य रस्ता तोच असल्या कारणाने त्याच रस्त्याने प्रवास 

करावा लागत आहे, त्याच रस्त्याने एका नाल्याला पुलाची पण गरज आहे,त्या नाल्याजवळ छोटा मोटा अपघात होऊ शकतो,माझा शेतकरी राजा सहन शीलत्तेचा राजा आहे हे सर्व एवढे दिवसापासून सहन करत आहे पण प्रशासनाला जाग आली नाही.मात्र प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आहे आता आपटी आणि शेळी महाड रस्ता होण्यासाठी आपटी आणि शेळी (महाड) ग्रामस्थांनी संपूर्ण विश्वास अशोक उईके मंत्री यांच्यावर दाखवला आहे की आमची अपेक्षा तेच पूर्ण करतील अशा ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here