७/१२ कोरा आंदोलनात राळेगावकरांचा सहभाग - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, July 11, 2025

७/१२ कोरा आंदोलनात राळेगावकरांचा सहभाग

राळेगाव (नरेश राऊत) : शेतकरी कर्जमाफी करीता बच्चु कडू यांच्या नेतृत्वात पापळ ते चीलगव्हाण ७/१२ कोरा यात्रा यात्रा सुरू आहे. या आंदोलनात राळेगाव येथील युवा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला .
राळेगाव नगर पंचायतचे नगर सेवक मंगेश अशोकराव राऊत, प्रहार तालुका अध्यक्ष संजय दुरबुडे , राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार गट) तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, राहुल बहाळे , नितिन कोमारवार विष्णु तोडासे, शाम धुर्वे, यांनी पदयात्रा मध्ये सक्रीय सहभाग घेतला.
मातीच्या स्वातंत्र्याचा लढा हा उद्देश ठेऊन शासनाला जाग करण्यासाठी शेतकऱ्याच्या न्याय मागण्यासाठी ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली. १४ तारखेला अंबोडा येथे सभा होणार असून त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन बच्चु कडू यांनी केले .या यात्रेत राळेगाव येथील नागरीक सहभागी झाले.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here