शिंदोडी येथे डाळिंब फळांची ४.५ लाखांची चोरी - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, July 4, 2025

शिंदोडी येथे डाळिंब फळांची ४.५ लाखांची चोरी



शिरूर :  शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात अज्ञात चोरट्यांनी शेतातून सुमारे ४.५ लाख रुपये किमतीच्या डाळिंब फळांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, शहाजी 
तुकाराम वाळूज (वय ५०, रा. शिंदोडी, ता. शिरूर) यांच्या गट क्रमांक १३ मधील २.५ एकर शेतात डाळिंब फळांची तोडणी पूर्ण झाली होती. दिनांक १ जुलै २०२५ सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते २ जुलै २०२५ सायंकाळी ४ वाजेदरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्याठिकाणाहून सुमारे ४५०० किलो भगवा जातीच्या डाळिंब फळांची चोरी केली. या मालाची एकूण किंमत 
₹४,५०,०००/- इतकी आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 472/2025 भा.दं.वि. कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा तपास पो.हवा. टेंगले करीत आहेत. तर गुन्हा ASI बनकर यांनी नोंदवला असून, प्रकरणाचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरट्यांचा लवकरच छडा लावण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here