टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : किक बॉक्सिंग स्पोर्टस असो. महाराष्ट्र यांच्यामार्फत पुणे येथे किक बॉक्सिंग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.यामध्ये महाराष्ट्रातील असंख्य जिल्ह्यातील शाळा,कॉलेज विद्यालयीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धात खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत "आब इंडिया खेलेंगा किकबॉक्सिंग" नवसंदेश देत राष्ट्रीय पातळी नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे खेळाडू किक बॉक्सिंग स्पोर्टस असो.अध्यक्ष निलेश शेलार यांच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास तयार असून वाडया वस्त्यावरील ग्रामीण खेळाडूना मार्ग खुला करून देणाऱ्या तसेच ग्रेस गुण प्राप्त व्हावे म्हणून खेळाडूंच्यासाठी झटणाऱ्या अध्यक्षांचे कौतुक महाराष्ट्रातील तमाम खेळाडू,पालक,दक्ष नागरीक करत आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मा.बापूसाहेब गावडे माध्य उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी हाजी येथील विद्यार्थीनीं मिजबा शौकत मुजावर फुल कॉन्टॅक्ट,तनिशा शौकत मुजावर केवन प्रकार तसेच लाईट कॉन्टॅक्ट फाईट प्रकारात माहिन शौकत मुजावर या सख्या बहिणींची निवड झाली.
स्पर्धेदरम्यान किक बॉक्सिंग स्पोर्टस असो.अध्यक्ष निलेश शेलार यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले खेळाडूंनी जिदद,चिकाटी,मेहनतीने स्पर्धेत कौशल्य सादर करत राज्यात प्रत्येक जिल्हा तसेच ग्रामीण भागात किकबॉक्सिंग खेळाचा प्रचार प्रसार होत असुन सर्व जिल्हा प्रतिनिधी जोमाने काम करत आसुन त्याच्या मेहनतीमुळे महाराष्ट्र संघ राष्ट्रीय पातळीवर जाणार आसल्याचे सांगितले.
या स्पर्धेचे नियोजन पुणे अध्यक्ष सतिश राजहंस,रेफ्री पॅनेल शिवानी राजहंस,श्रावणी राजहंस, यांनी पाहिले. शहराअध्यक्ष रुपेश परदेशी, दिपक गायकवाड,सुहास दाभाडे, प्राध्यापक कैलास महानोर,सारिका राजहंस,उपाध्यक्ष प्रतिक नेवसे, नागेश काळभोर, राणीत टाकळकर, नितीन वैरागर,जयंत कसबे यानी स्पर्धा यशस्वीपणे संपन्न करण्यास विशेष प्रयत्न केले.








No comments:
Post a Comment