कांता राठोड (हडपसर प्रतिनिधी)
२३/११/२०२२ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ काळेवाडी 25 वा वर्धापन दिन ज्योतिबा मंगल कार्यालय काळेवाडी येथे नियोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष ह .भ .प किसन महाराज चौधरी, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विजय देशमुख दबडगावकर भारतीय ज्येष्ठांची अर्थक्रांती जीवनगौरव राष्ट्रीय समन्वय, स्मरणिकेचे प्रकाशन मा. अविनाशजी म्हाकवेकर( दैनिक सकाळ सहयोगी संपादक पिं. चिंचवड) प्रकाशन मा.डी के वळसे पाटील दैनिक सकाळ पुणे ज्येष्ठ पत्रकार, जेष्ठ नागरिक संघ काळेवाडी संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे( काका )मा.उषाताई ढोरे माजी महापौर पिं. चिंचवड मनपा, मा. मच्छिंद्र तात्या तापकीर विरोधी पक्ष नेते पिं. चिंचवड मनपा, चंद्रकांत आण्णा नखाते नगरसेवक पिं. चिंचवड मनपा, सुनील तात्या पालकर सामाजिक कार्यकर्ते, शारदा ताई मुंडे समाज प्रबोधनकार, अरुणजी बागडे
,वृषालीताई मरळ, सुरेश( भाऊ)डोळस लोक कलावंत व शिने अभिनेते, कांता( भाऊ)राठोड झेप फाऊंडेशन पुणे( महाराष्ट्र राज्य) संस्थापक /अध्यक्ष, प्रशांत रोकडे दिग्दर्शक व संघाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव, व सर्व सभासद व अनेक मान्यवर उपस्थित होते. संघाच्या अध्यक्षाचा पुरस्कार व सत्कार,संघाची ज्येष्ठ आदर्श माता पुरस्कार प्रदान, ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार, संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे यांचे मनोगत मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राची लोककला ,व रोम्य महोत्सव वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम, अशी रूपरेषा होती अनेक मान्यवरानी मनोगत व मार्गदर्शन केले.या कार्यक्रमातील प्रत्येक मान्यवरांना स्मरणिकेचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी संघामार्फत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.



No comments:
Post a Comment