निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
निर्वी (ता. शिरूर) :-येथील सोनवणे वस्ती परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे निर्वी येथील सोनवणे वस्ती येथे शेतकरी शंकरराव मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरासमोरील अवघ्या काही फुटाच्या अंतरावरील गोठ्यात बिबट्याने एका शेळीवर हल्ला करुन ठार मारले आहे ही घटना (दि.२६)सायं.७ च्या सुमारास घडली आहे.गोठ्यात जखमी अवस्थेत पडलेली शेळी दिसल्यावर ही बाब शंकरराव मच्छिंद्र सोनवणे यांनी तात्काळ माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे आणि वनरक्षक संतोष सोनवणे यांना सांगितली. त्यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक विशाल चव्हाण,अभिजित सातपुते, नवनाथ गांधले यांच्याशी संपर्क करून सविस्तर महिती सांगितली त्यावेळी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्यांनी सदर घटनेचा पाहणी केली सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा देऊन बिबट्याचा शोध घेण्यात आला. या सर्व घडलेल्या घटनेबाबत निर्वी येथील आदर्श मा. सरपंच तात्यासाहेब खंडेराव सोनवणे यांनी वन विभाग अधिकारी यांना त्वरित पिंजरा लावण्याचे, आणि सदर शेतकरी यांना नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केली.तसेच शिरूर तालुक्यामध्ये गावागावात बिबट्याचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी बिबट्याने मानवी जीवावर देखील हल्ला केला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळेस कोणी विद्युत पंप सुरू करून शेतीला पाणी देऊ शक्य होत नाही तरी शेतीसाठी दिवसा बारा तास सेवा देण्यात यावी बंद केलेले विद्युत रोहित पुन्हा सुरू करण्यात यावे असे आवाहन निर्वी गावचे माजी आदर्श सरपंच तात्यासाहेब खंडेराव सोनवणे यांनी विद्युत वितरण अधिकाऱ्यांना केले आहे वन विभाग अधिकारी त्वरित घटनास्थळी आल्याबद्दल निर्वी ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले सदर घटनेने निर्वी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


No comments:
Post a Comment