ऊसाचे पाचट जाळू नका - जयवंत भगत - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, November 28, 2022

ऊसाचे पाचट जाळू नका - जयवंत भगत


              पाचट ठेवलेला रामदास फडके यांचा शिंदोडी येथील ऊस..

निर्वी प्रतिनिधी:-शकील मणियार

तालुका कृषी अधिकारी शिरूर कार्यालयाने विविध मोहीमा हाती घेतल्या जात असुन जमिन सुपिकता साठी व खोडव्याचे उत्पादन वाढीसाठी ऊस पाचट व्यवस्थापन हा कार्यक्रम लोकसहभागातुन कृषी विभागाने हाती घेतला त्यासाठी गावोगावी जनजागृतीचे काम करून ऊस पाचट व्यवस्थापनचे महत्व पटवुन दिले जाणार आहे शेतकऱ्यांना पाचट कुटी मशीन परिसरात अनूदानीत उपलब्ध झाल्या आहेत. पाचट कुटी आता सहजतेने करणे शक्य होणार आहे.खोडवा ऊसामध्ये पाचट व्यवस्थापनचा चांगला फायदा दिसुन येत आहे लागणीप्रमाणे खोडवा ऊसाचे उत्पादन येण्यास मदत होणार आहे पाचट व्यवस्थापन किती महत्वाचे ठरत आहे हे शेतकऱ्यांना पटत आहे शिंदोडी गुनाट निर्वी चिंचणी धुमाळवाडी परिसरात कृषी सहायक जयवंत भगत यांनी शेतकऱ्यांना पाचट ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पाचट ठेवलेल्या शेतात कुटी मशीनच्या आधारे पाचट कुटी करून पाचट कुजून खत होण्यासाठी त्यावर ३० ते ३५ किलो युरीया ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १ लिटर पाचट कुजविणारे कल्चर वापरण्यास त्यांनी सांगितले आहे एकरी ४ टन पाचट मिळत असुन त्यात साधारणपणे २० किलो नत्र ८ किलो स्फुरद तर ३० ते ४० किलो पालाश सह १ ते १.५ टन सेंद्रिय कर्ब मिळण्यास मदत होत आहे जमिनीची सुपिकता सोबतच खोडवा ऊसाचे उत्पादन वाढीचा दुहेरी फायदा होत असल्याची माहिती कृषी सहायक जयवंत भगत यांनी दिली आहे तसेच गुनाट शिंदोडी चिंचणी निर्वी धुमाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना पाचट न जाळण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here