गुनाट येथे पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, November 28, 2022

गुनाट येथे पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम


निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार

गुनाट (ता.शिरूर)

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट यांच्या संयुक्त विद्यमाने गुनाट ता शिरूर येथे पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतुन वनराई बंधारे टाकण्यात आला

वनराई बंधारे टाकल्यामुळे वाहुन जाणारे ओढेच्या पाणी जाग्यावर स्थिर राहते व स्थिर राहिल्यामुळे परिसरात पाण्याची पातळी वाढुन पिकांना संरक्षित पाणी देता येते अनेकदा पाणी टंचाई मुळे रब्बी हंगामातील पिके जळुन जातात परंतु वनराई बंधारे टाकल्याने पाण्याची पातळी वाढल्याने संरक्षित पाणी देण शक्य होत असल्याने पिकाच्या उत्पादनात वाढ होते

कृषी पर्यवेक्षक के के वीर,शिवाजी गोरे यांनी तांत्रिक माहिती दिली दत्त माध्यमिक विद्यालयातील मुलांनी व कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी व शिक्षकांनी श्रमिक योगदान दिले वनराई बंधारा लांबीला २७ फूट व उंचीला  पावणे तीन फुट होऊन पाणी साठवण १२५  फुटांपर्यंत होणार असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक के के वीर यांनी दिली. 

दत्त माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक भाऊसाहेब धुमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे व विद्यालयातील शिक्षक वृंद मध्ये पुष्पा वाघमोडे वंदना कोठावळे संगिता सोनवणे समवेत विद्यार्थी सह गावचे कृषी सहायक जयवंत भगत कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे के के वीर यांनी उपस्थित राहुन योगदान दिले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here