निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
शिरूर शहरात रयत ग्राउंड वर भरलेल्या कृषी प्रदर्शनात शेती उपयुक्त औजारे ट्रक्टर उच्च तंत्रज्ञान आधारित विविध सुविधा खाद्य पदार्थ अशा विविध स्टॉल च्या माध्यमातून तंत्रज्ञान जनजागृती होत असुन शासनाच्या कृषी विभागाचा स्टॉल वर ही उल्लेखनीय सेवा शेतकऱ्यांना दिली जात आहे कृषी विभागाच्या स्टॉलवर कृषी विभागाच्या शेतकरी हितार्थ विविध योजनांची जनजागृती करत असुन शेतकरी अपघात विमा प्रधानमंत्री पिक विमा योजना व महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे यांना अनुदान बाबत भेठी देणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे
शिंदोडी ता शिरूर येथील काळे परिवारात मच्छिंद्र काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचा प्रस्ताव परशुराम ओव्हाळ कुटुंबीयांनी कृषी प्रदर्शनात सादर केला प्रस्ताव तयार करण्याकामी मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे कांतीलाल वीर कृषी सहायक जयवंत भगत महादेव गदादे यांनी तात्काळ सहकार्य करून प्रस्ताव तयार करून दिला असून ओव्हाळ यांनी समाधान व्यक्त केले.


No comments:
Post a Comment