दादाभाऊ चिखले यांना डॉक्टरेट (पीएचडी ) प्रदान - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, December 3, 2022

दादाभाऊ चिखले यांना डॉक्टरेट (पीएचडी ) प्रदान



निर्वी प्रतिनिधी : शकीलभाई मानियार

पिंपरी दुमाला (ता.शिरूर) बर्‍याच देशांमध्ये, ही एक संशोधन पदवी आहे, जी प्राप्त झाल्यावर धारकाला विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी पात्र मानले जाते. अशा अनेक पदव्या आहेत, त्यातील सर्वात सामान्य म्हणजे 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' (पीएचडी), जी मानवतेपासून विज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये दिली जाते. हि प्राप्त झाल्यामुळे पिंपरी दुमाला येथील एका छोट्याश्या गावी जन्मलेले युवा उद्योजक दादाभाऊ गीताराम चिखले यांना द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस ( फ्रान्स ) कडून बिझनेस मॅनेजमेंट मधील मानद पीएचडी प्रदान करण्यात आली . डॉक्टरेट ( पीएचडी ) प्रदान कार्यक्रम नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला . डॉ . दादाभाऊ चिखले यांनी अनेक नामांकित कंपन्यांना सेवा दिलेली आहे . त्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुण - तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे . सामाजिक कार्यातदेखील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे या निवडीबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, जिल्हा सरचिटणीस एकनाथ थोरात, शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर, शिरूर शहराध्यक्ष शकीलभाई मनियार, तालुका कार्याध्यक्ष हेमंत वायदंडे यांनी अभिनंदन केले व पिपंरी दुमाला ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्या अर्धांगिनी माजी आदर्श सरपंच गायत्री चिखले यांनी त्यांना मोलाची अशी साथ दिली त्याचबरोबर गायत्री चिखले यांना ही अनेक वेळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here