फडणवीस यांनी सांगितले की, “मुंबई मेट्रोचे तिकीट जेव्हा आम्ही व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून दिले, तेव्हा 50% पेक्षा जास्त तिकिटांची बुकिंग डिजिटल झाली. त्यामुळे आता अधिकाधिक सरकारी सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.” यामुळे महाराष्ट्रातील नागरिक कुठेही ऑनलाइन पोर्टल्स किंवा कार्यालयांमध्ये जाण्याच्या झंझटीत अडकणार नाहीत.
या नव्या सुविधेमुळे गावातील शेवटच्या व्यक्तीलाही सरकारी सेवा थेट मोबाईलवर मिळणार असून, शासन आणि जनतेतील अंतर कमी होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईत आंत्रप्रेन्योर म्युझियम आणि इनोव्हेशन सिटी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मुंबईत लवकरच ‘आंत्रप्रेन्योर म्युझियम’ उभारले जाणार असून, यात देशभरातील उद्योजकांच्या यशोगाथा संग्रहित केल्या जातील.तसेच, ‘इनोव्हेशन सिटी’ प्रकल्पासाठी टेक लीडर्स असोसिएशनसोबत करार करण्यात आला आहे. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेक इंडस्ट्रीला नवे उभारी मिळेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र डिजिटल क्रांतीच्या दिशेने
मुंबई टेक विकमधील या घोषणांमुळे महाराष्ट्र आता डिजिटल गव्हर्नन्समध्ये देशात आघाडीवर राहणार आहे. व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स, आंत्रप्रेन्योर म्युझियम आणि इनोव्हेशन सिटी या तिन्ही उपक्रमांमुळे राज्याला डिजिटल युगात नवसंजीवनी मिळणार आहे.





No comments:
Post a Comment