उरुळी कांचन येथे ‘कृषी वैभव’ प्रदर्शनाला उद्या भव्य सुरुवात; शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व नवकल्पनांचे एकाच छताखाली दर्शन - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, February 28, 2025

उरुळी कांचन येथे ‘कृषी वैभव’ प्रदर्शनाला उद्या भव्य सुरुवात; शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व नवकल्पनांचे एकाच छताखाली दर्शन


पुणे : राज्यस्तरीय ‘कृषी वैभव’ कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला उद्या (शनिवार, 1 मार्च) भव्य सुरुवात होणार आहे. उरुळी कांचन येथील मणिभाई देसाई कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे आयोजित या प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष असून, शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेतीसाठी लागणारे अवजारे, तसेच पशुपालन व कृषी संशोधनाशी संबंधित माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.28 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन पुणे-सोलापूर महामार्गालगत, उरुळी कांचन येथील पीएमटी बस स्टॉपच्या मागे आयोजित करण्यात आले आहे.

        
कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण

150 हून अधिक पशुपक्षी आणि आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाची माहितीनवीन बियाणे, खते, औषधे आणि त्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक ट्रॅक्टर, अवजारे, सिंचन प्रणाली आणि यंत्रसामग्री ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेडनेट, सोलार पंप, शेतीसाठी आवश्यक आधुनिक साधनांची प्रदर्शनी मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पशुखाद्य आणि कृषी पूरक उद्योगांची माहितीबचत गटांचे मोफत स्टॉल आणि लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क                     शेतीतील नाविन्य व तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, बदलते हवामान आणि संसाधनांच्या मर्यादा या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी नवनवीन संशोधनाचा स्वीकार करून उत्पन्न वाढवावे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या आपली उत्पादने व सेवा येथे सादर करणार आहेत.

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा - आयोजकांचे आवाहन

शनिवारी दुपारी 4 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी शेती व पशुपालन क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान पाहण्याची व जाणून घेण्याची ही नामी संधी असणार आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here