पुणे : रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीसांनी कोंढवा परिसरात जोरदार कारवाई करत मॉडिफाईड सायलेन्सर बसवून फटाके वाजवणाऱ्या वाहनचालकांवर चाप लावला आहे.
गुरुवारी (२८ फेब्रुवारी) कोंढवा पोलिसांनी विशेष मोहिम राबवत अशा एकूण २० बुलेट दुचाकींवर कारवाई केली. या वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून पुणे महानगरपालिकेच्या रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.
मोदीफाइड सायलेन्सरमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाने जेष्ठ नागरिक, आजारी रुग्ण तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वारंवार येत होत्या. यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलत ही विशेष मोहिम हाती घेतली.
ही कारवाई पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री. धन्यकुमार गोडसे, तसेच कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर व गुन्हे निरीक्षक श्री. राऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कोंढवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा प्रकारच्या कारवायांमुळे परिसरातील शिस्त कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









No comments:
Post a Comment