श्री संत सदगुरू सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कारेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, February 13, 2025

श्री संत सदगुरू सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कारेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन


सणसवाडी प्रतिनिधी : रिजवान बागवान 


सणसवाडी : श्री संत सदगुरू क्रांतीकारी सेवालाल महाराज मित्र मंडळ कारेगाव ता.शिरूर  व गोर सेना संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कारेगाव ता.शिरूर येथे क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.तसेच जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत हरी भक्त पारायण मंगल महाराज यांचा गोर बंजारा बोली भाषेत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.तसेच15 फेब्रुवारी रोजी सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत सेवा लीलामृत ग्रंथ पारायण होणार आहे.तसेच आठ ते दहा वाजता क्रांतिकारी श्री संत जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असुन पुन्हा गोर बंजारा बोलीभाषेतील भजन व येणाऱ्या पाहुणे मंडळी यांचे स्वागत व सत्कार कार्यक्रम होणार आहे.व ठीक बारा वाजता श्री संत सेवालाल महाराज यांच्या भोग लावण्याचा कार्यक्रम होणार असुन व त्यानंतर संध्याकाळी चार ते नऊच्या दरम्यान भव्य मिरवणूक राहील असे आयोजक टीम क्रांतिकारी सेवालाल महाराज मित्र मंडळ कारेगाव यांनी माहिती दिली आहे.


जयंती कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आव्हान समितीचे अध्यक्ष देविदास भाऊ पवार,उपाध्यक्ष अनिल भाऊ जाधव, सचिव कारेगाव नगरीचे कारभारी निलेश भाऊ जाधव,शहसचिव जगदीश चव्हाण सदस्य विठ्ठल साहेब पवार,शरद भाऊ जाधव,कुणाल जाधव,अभिषेक जाधव,धीरज राठोड,निशांत जाधव,विष्णू राठोड,रामेश्वर पवार,गोकुळ राठोड,गोपाळराव पवार,विकास राठोड,वीरेंद्र राठोड,गजानन आडे,सुमित जाधव, अमोल जाधव,अरविंद जाधव व समस्त सर्व कारेगाव येथील गोरबंजारा बांधव यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here