पळशी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अखेर निलंबित - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, February 14, 2025

पळशी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अखेर निलंबित




पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर 


पारनेर : पळशी येथील शासकीय आश्रम शाळेतील गैरप्रकारांची चौकशीची मागणीआमदार काशिनाथ दाते सर यांनी विधानसभेत हिवाळी अधिवेशनात केली होती. आमदार साहेबांच्या मागणीनुसार आश्रम शाळेची चौकशी करण्यात आली. 326 मुला मुलींची शिक्षण वस्तीगृह असलेल्या आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या, आरोग्याचा प्रश्न सुरक्षिततेचा प्रश्न अशुद्ध पिण्याचे पाणी निकृष्ट भाजीपाला मिळत असल्याची तक्रार आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. साहेबांच्या मागणीनुसार चौकशी केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता नागरगोजे या दोषी आढळल्या ने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

दोन तीन दिवस पाणी न येणे आंघोळीसाठी पाणी नसणे अशुद्ध पिण्याचे पाणी, पाण्याच्या टाक्या साफ न करणे खराब व निकृष्ट दर्जाचा भाजीपाला वापरणे भात व भाजीत आळी आढळणे हे प्रकार आश्रम शाळेचे कायम सुटले.जावे.

मुख्याध्यापिकेवरतनिलंबनाची कारवाई केली असली तरी आश्रम शाळेतील समस्या कायमस्वरूपी सुटतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.






 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here