राळेगाव येथे जनता दरबार - शहरी व ग्रामीण भागाकरीता शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, February 10, 2025

राळेगाव येथे जनता दरबार - शहरी व ग्रामीण भागाकरीता शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न.




यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे


राळेगाव : राळेगाव येथे  दि,8/2/25 ला शासन आपल्या दारी,जनता दरबाराचे आयोजन.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना.अशोक उईके आदिवासी विकास मंत्री म.रा.तर प्रमुख पाहुणे म्हणून  चित्तरंजन कोल्हे, डॉ.कुनाल भोयर, विशाल खत्री सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव, 

अमित भोईटे तहसीलदार राळेगाव, केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव,सौ.प्रितीताई  काकडे जि.प.सदस्य, डॉ.सविता पोटदुखे मॅडम,तथा सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी,व राळेगाव तालुक्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  अनेक शासनाच्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना चेकचे व साहीत्यांचे  ना.अशोक उईके यांच्यि हस्ते देण्यात आले. यावेळी ना.अशोक उईके यांनी अतिक्रमण केलेल्या गरीबांना त्यांच्या हक्काचे आठ अ पट्टे , तसेच पांदनरस्ते , निराधार,व इतर अन्य कुठल्याही योजनांचा लाभ हा माझ्या मतदार  बांधवांना तातडीने देण्यात येईल. 

यावेळी प्रशासकीय यंत्रणेला पारदर्शक काम करण्याचे आदेश दिले.यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमात महावितरण, आरोग्य विभाग, कृषी विभाग,म.न.रे.गा विभाग,वनविभाग,उमेद ,माहीम पाणीपुरवठा विभाग,महसुल विभाग,सेतू.सुविधा केंद्र, तसेच एकात्मिक बाल विकास सेवा केंद्रातील अंगणवाडी सेविका पोशन आहार,बालक पोशन आहार,व ईतर स्वाधिन पदार्थाचे स्टाॅल लावले होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन सागर विटाळकर यांनी केले तर प्रास्ताविक विशाल खत्री सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित भोईटे तहसीलदार यांनी केले.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here