पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर
पारनेर : नगर औरंगाबाद रस्त्यावर इमामपूर घाट ते पांढरी पोल चार किलोमीटरच्या रस्त्यामध्ये दरवर्षी दहा ते पंधरा जणांचा अपघाताने मृत्यू होतो. या रस्त्याने अवजड वाहने तसेच शनिशिंगणापूर देवगड ही देवस्थाने असल्याने वाहतुकीची मोठी वर्दळ असते.
या रस्त्यांवर उपाययोजनांची कमी असल्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे व आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमावण्याचे दुःख सहन करावे लागत आहे.
वारंवार घडणाऱ्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यावर खासदार लोकनेते निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. गती कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवणे दिशादर्शक फलक व आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहेत.





No comments:
Post a Comment