असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकाच्या फेरपालटिचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. बहुतांश जमिनीत नायट्रोजन, गंधक, झिंक आणि लोहाच्या कमतरता दिसून येत आहेत. त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षण करूनच योग्य खते वापरावी, असे आवाहन शास्त्रज्ञ डॉ. अमोल विरकर यांनी केले आहे.
या बाबी फायद्याच्या...
९९.९०% माती नॉन सलाईन आहे. मिठाचे प्रमाण कमी असल्याने पिकांची चांगली वाढ होते.
99.86% क्षेत्रात मॅगनीजचे प्रमाण योग्य. प्रकाश संश्लेषणात मदत, झाडांची वाढ वेगाने होण्यासाठी फायदा.
88.78% क्षेत्र पोटॅशियम बाबत समृद्ध झाडांची वाढ रोगप्रतिकार क्षमता वाढते.
99.98% क्षेत्रात तांब्याचे प्रमाण योग्य रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे.
मातीतील पोषणतत्वाची गरज लक्षात घेऊन, पीकनिहाय आवश्यक घटक आणि हवामान यानुसारच खते वापरण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी माती परीक्षण करणे महत्त्वाचे आहे किंवा काळाची ती गरजच आहे.
डॉ. अमोल विरकर
सहाय्यक प्राध्यापक, शासकीय कृषी महाविद्यालय, काष्टी, मालेगाव.
मोबाईल नंबर : ९८९०६७८२७५










No comments:
Post a Comment