शिरूर पोलिसांची तत्पर कारवाई – मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, February 20, 2025

शिरूर पोलिसांची तत्पर कारवाई – मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल


 
शिरूर : दि. 20 फेब्रुवारी 2025 – शिरूर पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या एका चालकावर तत्काळ कारवाई करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शिरूर पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 19 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजता शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर येथे एका वाहनचालकाने मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन क्रमांक MH-05-A-77 थांबवून चौकशी केली असता, चालक अशोक जाधव (वय 36, रा. प्रमोद प्रेमपार्क, पाबळ फाटा, शिरूर, पुणे) हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले.


याप्रकरणी मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस हवालदार शिंदे (बक्कल नं. 2463) आणि तपासी पोलीस हवालदार वाघमोडे (बक्कल नं. 2214) यांनी केली. पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिरूर पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे मद्यधुंद वाहनचालकावर नियंत्रण मिळवत संभाव्य अपघात टाळण्यात यश आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here