राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 19, 2025

राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे


वणी: येथील राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अभय पारखी होते. यावेळी अनीता टोंगे,  प्रतिश लखमापुरे,  सुनील गेडाम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात पारखी सरांनी शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर प्रकाश टाकत, उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन  हरीष वासेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन  हरीष बोढाले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here