३० एप्रिलपर्यंत जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' लावणे बंधनकारक – नियमभंग केल्यास कारवाई होणार - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, February 28, 2025

३० एप्रिलपर्यंत जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' लावणे बंधनकारक – नियमभंग केल्यास कारवाई होणार

मुंबई : राज्यातील २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन विभागाने ३० एप्रिल २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली असून, त्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी 'एचएसआरपी' अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, अनेक गुन्हेगार वाहने चोरी करून अथवा क्रमांक प्लेट बदलून गुन्हे करून फरार होतात. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांसाठी 'एचएसआरपी' अनिवार्य केली होती. मात्र, जुन्या वाहनधारकांसाठी ही अट लागू नव्हती. आता महाराष्ट्र सरकारने २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठीही ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
एचएसआरपी म्हणजे काय?

'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी अॅल्युमिनियमपासून बनलेली असून तिच्यावर क्रोमियम आधारित होलोग्राम, सात अंकी कोड आणि रिफ्लेक्‍टिव्ह फिल्म असते. हे तांत्रिक वैशिष्ट्ये वाहनचोरी रोखण्यासाठी आणि ट्रॅकिंगसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

कुठे आणि कशी मिळेल 'एचएसआरपी'?

  • वाहनधारकांना अधिकृत विक्रेत्यांकडून किंवा परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून 'एचएसआरपी' साठी ऑनलाइन नोंदणी करता येईल.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर निश्चित केलेल्या वाहन तपासणी केंद्रावर जाऊन 'एचएसआरपी' बसवावी लागेल.
  • वाहनधारकांना ठराविक शुल्क भरावे लागेल.
  •  नियम मोडल्यास कठोर कारवाई

३० एप्रिल २०२५ नंतर 'एचएसआरपी' न बसवलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस याबाबत विशेष मोहीम राबवणार आहेत.

वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना:

  • जुन्या वाहनधारकांनी तातडीने 'एचएसआरपी' साठी अर्ज करावा.
  • वाहनांची अधिकृतता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
  • अंतिम तारखेपूर्वी 'एचएसआरपी' बसवून दंड आणि कारवाई टाळा.

नवीन नियमावलीमुळे काय होणार?

या निर्णयामुळे वाहन चोरी, गुन्हेगारी, बेकायदेशीर क्रमांक प्लेट बदलण्याचे प्रकार रोखले जातील. तसेच, वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे 

         



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here