निमोणे : निमोणे येथे माघ पौर्णिमेनिमित्त यात्रा महोत्सव संपन्न झाला माग पौर्णिमा म्हणजे खंडोबा आणि माळसादेवीचा विवाह सोहळा झाला तो दिवस दरवर्षीप्रमाणे हा यात्रा महोत्सव निमोणे येथे साजरा केला जातो या यात्रा महोत्सवामध्ये सकाळी 'श्रीं ' चा अभिषेक झाला त्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच सायंकाळी मानाच्या काठ्यांची मिरवणूक पार पडली तसेच मानाचा गाडा ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला हा उत्सव पाहण्यासाठी निमोणे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती मनोरंजनासाठी साहेबराव नांदवळकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
तसेच आज सायंकाळी ठीक ४.०० वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार आहे या आखाड्यासाठी निमोणे तसेच निमोणे पंचक्रोशीतील नावाजलेले मल्ल या आखाड्यात कुस्ती खेळण्यासाठी हजेरी लावतात.
या यात्रेनिमित्त सर्व गावकरी तसेच कामानिमित्त बाहेरगावी गेलेले गावकरी मंडळी या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित असतात तसेच गावातील सर्व वैचारिक राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वजण या महोत्सवाचा आनंद लुटतात.







No comments:
Post a Comment