दौंड तालुक्यातील वरवंड गावचे सुपुत्र सचिन दिवेकर यांना स्टार हेल्थ कंपनीकडून पुरस्कार - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, March 1, 2025

दौंड तालुक्यातील वरवंड गावचे सुपुत्र सचिन दिवेकर यांना स्टार हेल्थ कंपनीकडून पुरस्कार


वरवंड (गौरव दिवेकर) :  दौंड तालुक्यातील वरवंड गावातील सचिन दिवेकर यांना हडपसर विभागातून एल टी पी चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विजय अरोरा, 

विजय मिश्रा आणि हनुमंत गायकवाड यांच्या उपस्थितीत सिब्बेश सिन्हा यांच्या हस्ते देण्यात आला. सचिन दिवेकर हे गेले पंचवीस वर्ष मेडिकल आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि दहा वर्ष आरोग्य विमा क्षेत्रातील कार्यात गुंतले आहेत.सचिन दिवेकर यांच्या यशामागे विमा ग्राहकांच्या सहकार्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

त्यांनी ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यातून त्यांच्या कार्याची प्रतिष्ठा निर्माण केली आहे. सचिन दिवेकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, 

ज्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.सचिन दिवेकर यांच्या या यशाने वरवंड गावातील नागरिकांना अभिमान वाटत आहे आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन इतरांनीही अशा प्रकारचे यश मिळवावे, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here