(तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झेडपी पंचायत समितीत सत्ता द्या.......आमदार काशिनाथ दाते सर)
पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर
पारनेर : पारनेर तालुक्याचे आमदार कन्हेरपोखरी चे भूमिपुत्र आमदार काशिनाथ दाते सर यांचा सत्कार पोखरी परिसराच्या वतीने पेढे तुला करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांची गावातून पुष्पवृष्टी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारनेर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूमिपुत्र आमदार झाल्याने नागरिकांमध्ये आनंद उत्साह ओसंडून वाहत होता. अनेक ग्रामस्थांनी श्री रंगदास स्वामीचरणी नवसपुर्ती करत पेढे तुला केली.
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार काशिनाथ दाते सर यांनी जिल्हा परिषद सभापती कालखंडात देखील आपल्या परिसरामध्ये कोट्यावधी रुपयांची कामे मार्गी लावलेली आहेत यापुढील काळात देखील प्रलंबित कामे मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
पारनेर तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रश्नावर शाश्वत काम करणार असल्याचे सांगताना आमदारकी बरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये देखील आपली ताकद उभी करावी लागेल. यावेळी कार्यक्रम प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, राष्ट्रवादीचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रखमाजी कापसे सर, सरपंच लहू भालेकर, ज्येष्ठ नेते वसंत चेडे , भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष दुधाडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे , बाबाशेठ खिलारी, शंकर नगरे, सचिन शेळके , डॉ. अविनाश शेलार नितीन पवार, अण्णासाहेब पवार निजाम पटेल बाबुराव आहेर . ज्ञानदेव पवार सचिन पवार परसराम शेलार आण्णा खैरे अशोक खैरे बाबुराव पवार .
यादव फरतारे सोपान फरतारे विकास . शिवले शिवम पवार पंडीत खैरे शाम खैरे गणेश फरतारे . . ज्ञानदेव पवार दत्ता शिंदे गोरख फरतारे संतोष शेलार निलेश पवार महादु पवार यांस पोखरी परिसरातील पदाधिकारी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment